Pimpri News: खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांनी कोरोना लसीसाठी ‘स्मार्ट सारथी अ‍ॅप’वर नोंदणी करावी, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनाची लस अंतिम टप्प्यात असून जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात शासकिय, महापालिका व खासगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.

लस टोचून घेण्यासाठी शहरातील खासगी वैद्यकिय व्यवसायिकांनी दोन दिवसांत महापालिकेच्या ‘स्मार्ट सारथी अ‍ॅप’वर नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोविड -19 वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी कोविड -19 लस निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी आगामी कोविड 19 लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खासगी आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यांची माहिती अहवाल (डाटाबेस) संकलन करण्याचे काम सुरु आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शासकिय, मनपा व खाजगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना कोवीड-19 प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 प्रतिबंधक लस पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील शासकिय, महापालिका व खासगी आस्थापना आरोग्य व वैद्यकिय क्षेत्रातील नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणार आहे.

त्यासाठी सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिक, इंडियन मेडिकल असोशिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (NIMA),पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन (PCDA), दंततज्ञ संघटना, पॅथोलॉजिस्ट संघटना, नर्सेस असोशिएशन, फार्मासिस्ट असोशिएशन यांनी कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सारथी अ‍ॅप वर तातडीने दोन दिवसांत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.