Pimpri Jumbo Covid Center News: कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, जम्बो कोविड सेंटरला मुदतवाढ

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची वाढती संख्या, संभाव्य तिसरी लाट विचारात घेता कै. अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जम्बो कोविड रुग्णालयातील 140 बेड आणि इतर बेड सुरु ठेवण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली. त्याकामी येणा-या 1 कोटी 42 लाख इतक्या खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा  पार पडली.  स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण 43 कोटी 98 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. प्रभाग क्रमांक 23 मधील हेडगेवार पूल ते कुणाल रेसिडेन्सी पर्यंत जाणारा 12 मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याकामी येणा-या 44 लाख 20 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 27 रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे आणि अनुषंगीक कामे करण्याकामी येणा-या 1 कोटी 92 लाख, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्यासाठी किमान वेतन कायदयानुसार 36 कामगार व 2 सुपरवायझर यांचे तीन महिने कालावधीकरीता येणा-या 29 लाख 47 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्याकामी औषधे आणि साहित्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यांच्या खरेदीकामासाठी येणा-या 45 लाख 1 हजार,  टाटा मोटर्स रस्ता भोसरी ते थरमॅक्स चौक रस्ता सुशोभिकरण व मध्यदुभाजक उद्यान विषयक कामाची देखभाल करण्याकामी येणा-या 1 कोटी 22 लाख इतक्या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

क आणि ई क्षेत्रिय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करण्यासाठी येणा-या 71 लाख 77 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. वैद्यकीय विभागाचे वापराकरीता ब्लड मोबाईल कलेक्शन व्हॅनचे मनपा स्पेसीफिकेशनप्रमाणे चॅसी खरेदी करण्यासाठी येणा-या 37 लाख 10 हजार अधिक सेवाकर इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.