Pimpri News : महापालिकेत बढत्यांचा धमाका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बढत्यांचा, बदल्यांचा धडाका आणि धमाका लावला आहे. महापालिकेतील 149 अधिकारी, कर्मचाऱ्यांना बढत्या दिल्या आहेत. यामध्ये सहाय्यक आयुक्त, सह शहर अभियंता, कार्यालयीन अधीक्षक, लेखापाल, उपलेखापाल यांचा समावेश आहे. दरम्यान, 25 जून रोजी 118 अधिकारी, कर्मचा-यांना बढत्या दिल्या होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर 11 हजार 460 कर्मचारी आहेत. सध्या 7 हजार 279 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बढत्या देण्यात येत आहेत.

पिंपरी महापालिका पद्दोन्नती समितीची 12 जुलै 2021 रोजी बैठक झाली. या सभेत सेवा ज्येष्ठतेनुसार बढत्या देण्यात आल्या आहेत. वामन नेमाणे, दिलीप आढारी यांना सहाय्यक आयुक्त, संजय कुलकर्णी यांना सह शहर अभियंता (पर्यावरण), संदेश चव्हाण यांना सह शहर अभियंता (विद्युत) कार्यालयीन अधीक्षक 17, लेखापाल 8, उपलेखापाल 26, मुख्य आरोग्य निरीक्षक 4, सहाय्यक उद्यान निरीक्षक 6, सहाय्यक हॉर्टी सुपरवायझर 5 आणि 81 जणांना मुख्य लिपिकपदी बढती देण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्त पाटील यांनी मागील रविवारी स्थापत्य विभागातील अभियंत्यांच्या बदल्या केल्या. विविध विभागात तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.