Pimpri News : हाथरस सामूहिक अत्याचाराचा वंचितसह वाल्मिकी समाजाकडून निषेध

एमपीसीन्यूज : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित वाल्मिकी समाजातील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येचा वंचित बहुजन आघाडीसह पिंपरी चिंचवड वाल्मिकी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक धनराज बिरदा, दिनेश सारवान, विक्रम खेराल, निलेश घुसर, नितीन चौहान, सनी खोकर यांच्यासह महिला आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उप[उपस्थित होते.

हाथरस येथे वाल्मिकी समाजातील तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्यावर केलेल्या अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच या प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांच्यावतीने करण्यात आली. तसेच या अमानुष अत्याचाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.