Pimpri News : मानवी अधिकारांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – मानव संसाधन विकास संस्थेच्या वतीने ‘मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 3) पार पडले. निहाल पानसरे यांच्या हस्ते आकुर्डीत हा प्रकाशन समारंभ पार पडला.

यावेळी मानव संसाधन विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हाळसकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष बसप्पा कोळी, सचिव सुनील उबाळे, कायदेतज्ज्ञ दिलीप देहरकर, उप संचालक विनोद सुवासे, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब रायकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर पुजारी, महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष नलिनी शिंदे, जेष्ठ नागरिक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळ गायकवाड, उपाध्यक्ष यतीन पालकर, मंगलसिंग कटारिया, सचिव नरेश आनंद, महाराष्ट्र राज्य महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्ष शोभा बागूल, उपाध्यक्षा अंजली बर्मन, सचिव रिबेका शिंदे , प्रदेश जनसंपर्क अधिकारी भीमराव सुतार, योगेश काळे, सगाई नायर, किशोर जाधव, प्रदेश वित्तीय सल्लागार योगेश गोसावी, बशीर शेख आदी अधिकारी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थित होते.

सामान्य जनतेच्या मानवी हक्कांची जनजागृती अभियान अंतर्गत जागतिक मानवाधिकार जाहिरनामा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अनिल म्हाळसकर यांनी दिली.

या पुस्तिकेतील माहिती संकलनासाठी विजय बोत्रे व विवेक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले. आभार किशोर जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.