मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pimpri News: नाताळ विशेषांकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड येथील दि युनायटेड ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या ’शब्द’ या नाताळ विशेषांकाचे मुंबईत प्रणीत फरांदे आणि निता मगर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

विक्रोळी येथील जीवन शांती चर्चमध्ये धर्मगुरू रेव्ह. एम. डी. बोर्डे यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ पार पडला. विशेषांकाचे संपादक ब्र.फ्रान्सिस गजभिव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रफुल्ल देवकुळे, नरेश नेरूरकर, रॉबीन घोडके, रेखा मगर, सुनिल मगर, दयानंद वाघमारे, ऑथोनी बनसोडे, कैलास नाईक आदी उपस्थित होते.

Latest news
Related news