Pimpri News: ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेच्या पत्रकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर आधारीत “कर्मयोगी नमो” या लघुपट स्पर्धेच्या जाहिरात पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश गोजमगुंडे, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस अनुप मोरे  सांस्कृतिक आघाडी संयोजक धनंजय शाळीग्राम, प्रदेश सहसंयोजक उमेश घळसासी, आदी रामचंद्रन, पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक नरेंद्र आमले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, बाबू नायर, सांस्कृतिक प्रकोष्ठ सहसंयोजक शाहीर चेतन हिंगे, नगरसेवक विकास डोळस, कुंदन गायकवाड आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश संयोजक शैलेश  गोजमगुंडे यांनी स्पर्धेची संपूर्ण माहिती देताना पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकार, विद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उस्पुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. पिंपरी-चिंचवड शहरतील युवा कलाकार व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक ठसा संपूर्ण राज्य भर उमटवतील, असे महेश लांडगे  स्पर्धेला शुभेच्छा देताना म्हणाले.

कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक आघाडी पिंपरी-चिंचवड शहर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शाहीर चेतन हिंगे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.