Pimpri News: खासदार बारणे यांच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (शनिवारी) मुंबईत करण्यात आले.

मुंबईतील मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, उपनेते रविंद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी 2021 या वर्षाची दिनदर्शिका तयार केली आहे. दिनदर्शिकेचे हे दहावे वर्ष आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.