Pimpri News: कोरोना कालावधीत गोरगरीब नागरिकांसाठी राहुल ठरतोय आरोग्यदूत

त्यांनी आजपर्यंत 50 जणांना प्लाज्मा मिळवून दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना धीर देणे, रुग्णांना विलगीकरणाची व्यवस्था करण्यास राहुल मोठी मदत करतात.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक कुटुंब सैरभैर होताना दिसत आहेत. बेड कुठे मिळेल, औषधे कोठून आणायची, रुग्णालय प्रशासनाच्या असहकार्याला सामोरे जावे लागत होते. अशा भयावह परिस्थितीत माजी सत्तारूढ पक्षनेते, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ पवार यांचे स्वीय सहाय्यक राहुल चंदेल नागरिकांच्या मदतीला धावून जात आहेत.

कोरोना टेस्ट करणे, संबंधित नागरिकांच्या घरातील सदस्यांची टेस्ट करणे, परिसर निर्जंतुकीकरण करणे, अत्यावश्यक परिस्थितीतील रुग्णांना प्लाज्मा मिळून देण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ते धावपळ करत आहेत. चिखली, घरकुल, नेवाळे वस्तीतील नागरिकांसाठी राहुल आरोग्यदूत ठरत आहेत.

शहरातील चिखली, घरकुल परिसरात गोरगरीब नागरिक मोठ्या संख्येने राहत आहेत. परिसरात सुरुवातीपासून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या महामारीत या भागाचे नेतृत्व करत असलेले माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे जनसंपर्क कार्यालय नागरिकांना मोठी मदत करत आहे. जनसंपर्क कार्यालय प्रमुख राहुल चंदेल परिसरातील नागरिकांना मोठी मदत मिळवून देत आहेत.

कोरोना टेस्ट करणे, संबंधित नागरिकांच्या घरातील सदस्यांची टेस्ट करणे, संबंधित परिसर निर्जंतुकीकरण करणे, अत्यावश्यक परिस्थितीतील रुग्णांना प्लाज्मा मिळवून देण्यासाठी राहुल यांची धावपळ सुरू असते.

त्यांनी आजपर्यंत 50 जणांना प्लाज्मा मिळवून दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना धीर देणे, रुग्णांना विलगीकरणाची व्यवस्था करण्यास राहुल मोठी मदत करतात. प्रभागातील नागरिकांना 20 हजार अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप केले आहे.

याबाबत बोलताना राहुल चंदेल म्हणाले, घरकुल भागातील अनेक नागरिक गरीब आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात बेड मिळण्यासाठी मोठी अडचण येत होती. प्रशासकीय यंत्रणेमध्ये समन्वय साधणे.

रुग्णवाहिका, बेड मिळवून देणे, कोविड केअर सेंटरला रुग्णांना पाठविणे ही कामे माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यापासून करत आहे. अनेकांना राज्य सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभ मिळवून दिला. बिले कमी केली. हे काम करताना मला वेगळाच आनंद मिळतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.