Pimpri News : अन रैंचो मित्राच्या भेटीसाठी थेट पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात

एमपीसी न्यूज – सहज पुण्यात आलो होतो म्हणत  रैंचो  अर्थात अभिनेता (Pimpri News) अमिर खान याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची शुक्रवारी (दि.10) भेट घेतली. याला कारण होते केवळ मैत्री. मात्र अमिर खानला असे अचानक आयुक्तालयात पाहून अनेकांना सुखद धक्का बसला.

अर्थात पोलिसांना भेटायला का आला, त्याचे काय काम होते अशा अनेक चर्चांना उधाण आले..हा..हा. म्हणता आमिर खानचा आयुक्तालयातील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. मात्र यावर भाष्य करताना आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले की, मुंबईत काम करत असताना अमिर खान यांची भेट झाली होती. त्या ओळखीतून आमची चांगली मैत्री झाली.

 

Nigdi Crime News : रुपीनगर येथे तिघांनी कोयत्याने फोडल्या दहा गाड्य़ांच्या काचा

 

मैत्री सेलिब्रेटींची असो की सर्व सामान्यांची ती सारखीच असते. मित्राची पोस्टींग (Pimpri News) असलेल्या आयुक्तालयाच्या जवळ येवून त्याला न भेटता जाणे अमिर खानला पटले नाही अन तो थेट आयुक्तालयात मित्राच्या भेटीला हजर झाला. मात्र त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.