Pimpri News: टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रावेत क्रिकेट संघाला विजेतेपद

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक 2020 दिवस -रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रावेत क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते या संघाला एक लाखाचे पारितोषिक देण्यात आले.

नवमहाराष्ट्र क्रीडांगणात झालेल्या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास उपमहापौर केशव घोळवे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक संदीप वाघेरे, माऊली थोरात, माजी नगरसेवक संतोष कुदळे उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, कै. योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या पिंपरी करंडक 2020 स्पर्धेमध्ये एकूण 48 संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत उत्साही वातावरणात हे सामने खेळवले गेले.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रावेत क्रिकेट संघ, रावेत यांनी पटकावले, द्वितीय क्रमांकाचे 50 हजार रुपयांचे पारितोषिक मृत्युंजय क्रिकेट संघ, तृतीय क्रमांकाचे 25 हजाराचे पारितोषिक प्रतीकदादा घुले व चतुर्थ क्रमांकाचे 15 हजार रुपयांचे पारितोषिक झुंजार क्रिकेट क्लब यांना मिळाले.

यावेळी युवा मंचच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांना देण्यात येणार्‍या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता नि:स्वार्थीपणे आपले कर्तव्य पार पाडणार्‍या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा “ कटिबद्ध जनहिताय कोविड योद्धा ” सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये वायसीएम रुग्णालयाचे डॉ. विनायक पाटील, डॉ. अभयचंद्र दादेवार, जिजामाता रुग्णालयाचे डॉ. संगीता तिरूमणी, डॉ. बाळासाहेब होडगर, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, अतुल सोनवणे, परिचारिका लोहार, जगताप, भजभुजे, गोरक्षक मंगेश नढे, कुणाल साठे, अभिजीत चव्हाण, अभिजीत शिंदे, आरोग्य कर्मचारी शांताराम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते भरत जमनानी, अजय नायर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, युवा मंचचे अध्यक्ष हरिष वाघेरे, युवराज वाघेरे, किरण शिंदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.