Pimpri News: सहाय्यक आयुक्त, उपायुक्तांच्या कामकाजाचे पुन्हा फेरवाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांच्या कामकाजाचे महिन्याला फेरवाटप केले जात आहे. आता पुन्हा एकदा सहाय्यक आयुक्त आणि दोन उपायुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे.

आकाश चिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्याकडे माहिती व जनसंपर्क आणि पशुवैद्यकीय विभाग सोपविला आहे. प्रशासनाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे प्रशासनासह पुन्हा उद्यानाची जबाबदारी दिली आहे.

तर, उपायुक्त मंगेश चितळे यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना आणि दक्षता व गुण नियंत्रण विभाग सोपविले आहेत. चितळे यांच्याकडील उद्यान विभाग कमी करत आकाशचिन्ह परवाना विभाग नव्याने दिला आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी हे फेरबदल केले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.