Pimpri News : वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पिंपरी चिंचवड समूहातर्फे रेकॉर्ड ब्रेक 803 रक्त पिशव्यांचे संकलन

एमपीसीन्यूज : “रक्त दान – श्रेष्ठ दान”,”आपण रक्तदान करायला याच, परंतु येताना आपले कुटुंब, मित्रपरिवार यांना सुद्धा सोबत घेऊन येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करीत रविवारी ( दि. 10 ) वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन पिंपरी चिंचवड समूहातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 803 रक्त दात्यांनी रक्तदान करत नवीन रेकॉर्ड केला. यामाध्यमातून राज्यात नव्हे तर जगात एक आदर्श निर्माण केला आहे.

रहाटणी येथील विमल गार्डन येथे हे शिबीर पार पडले. मागील साधारण नऊ महिन्यांपासून लाखो लोक कोविड बाधित झाले आहेत. त्यांना वैद्यकीय सेवा देण्यात यंत्रणांना मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळेच सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये सर्वत्र रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. शासन, विविध हाॅस्पिटल्स, पक्ष, सामाजिक संस्था रक्तदान करण्यासंबंधी जनतेस आवाहन करत आहे.

या पार्श्वभूमीवर वर्ल्ड मराठा ऑर्गनिझाशन पिंपरी चिंचवड समूहाने जास्तीत जास्त रक्त संकलित करण्याचे ध्येय ठेवले. समूहातर्फे रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कार्यात आपण स्वतः आणि इतरांनाही प्रेरित करावे, रक्तदान शिबिरात सहभागी व्हा आणि वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन तर्फे इतिहासाचे साक्षीदार बना असे आवाहन पिंपरी चिंचवडकरना केले.

या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 803  नागरिकांनी रक्तदान केले, आणि नवीन एक रेकॉर्ड तयार केला. रक्तदान शिबीरात रक्तदात्याची पूर्ण काळीजी घेत, कोविड नियमांचे पालन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.