Pimpri news: गणेशोत्सवामध्ये अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या अशिर्वादाने ऑनलाईन अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम घेण्यात आला. बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागप्रमुख नितीन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यामध्ये 13 लाखांहून अधिक चिमुकल्यांनी अथर्वशीर्ष पठण केले.

पुणे जिल्ह्यामध्ये 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालवधीमध्ये रोज सकाळी नऊ वाजता ऑनलाईन पद्धतीने अथर्वशीर्ष पठन करण्यात आले. श्री गुरूपीठ या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी याचे वाचन झाले. या सेवा मार्गाचा बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग गेल्या सात दशकांपासून राष्ट्राच्या सर्वागिण विकासासाठी कार्यरत आहे.

या विभागाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व युवक यांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. अथर्वशीर्ष पठणाने करोना संकटामध्ये सर्वांच्या अंगी मानसिक शांतता, धैर्य व सकारात्मक विचारसरणी निर्माण होऊ दे अशी मागणी गणपती बाप्पाकडे चिमुकल्यांनी केली यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.