Pimpri News: महापालिकेच्या जलतरण तलावावर पोहण्यासाठी आजपासून ‘अशी’ करा ऑनलाईन नोंदणी
एमपीसी न्यूज – उन्हाळा सुरु असल्याने महापालिकेच्या जलतरण तलावावर पोहण्यास येणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिकेने आजपासून ऑनलाईन पद्धत सुरु केली आहे. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळारील जतरण तलाव नोंदणी या लिंकवर क्लिक करुन बॅचचे आरक्षण करावे लागणार आहे.
महापालिकेच्यावतीने सध्या निगडी, पिंपळेगुरव, पिंपरीवाघेरे आणि कासारवाडी हे चार जलतरण तलाव नागरिकांना पोहोण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहेत. नेहरुनगर, यमुनानगर, संभाजीनगर येथील तलावात पाणी भरण्याची कार्यवाही सुरु आहे. पाणी भरताच पाणी शुद्धीकरण परिसर स्वच्छता, देखभाल व यांत्रिकी कामकाज सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हे तीनही तलाव पोहण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
सध्या उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे जतलतरण तलावावर पोहण्यास येणा-या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तलावावर गर्दीही वाढत आहे. तिकीटे घेण्यासाठी खिडकीजवळ खूप गर्दी होत आहे. प्रत्येक बॅचमध्ये जलतरण तलावावर क्षमतेप्रमाणे नागरिकांना पोहण्यासाठी प्रवेश दिला जातो. पण, ज्या नागरिकांना त्या बॅचमध्ये तिकीट मिळत नाही. ते नागरिक तक्रार करतात. त्यामुळे महापालिकेने ऑनलाईन पद्धतीने जलतरण तलावासाठी बॅचचे आरक्षण काढण्यास सुरुवा केली आहे. पोहण्यासाठी 21 ते 26 मे या कालावधीतील पहिला पासधारकांची सकाळी 6 ते 7 ची बॅच वगळता उर्वरित 7 बॅचचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले.
‘असे’ करा ऑनलाईन बॅचचे आरक्षण!
|