Pimpri News : रामकृष्ण गायकवाड लिखित ‘फिनिक्स भरारी – स्लम टू मिल्यनेअर’ या पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – डायमंड पब्लिकेशनच्या वतीने रामकृष्ण गायकवाड लिखित ‘फिनिक्स भरारी – स्लम टू मिल्यनेअर’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात ( Pimpri News ) आले.यावेळी बोलताना जोशी म्हणाले की,’फिनिक्स भरारी – स्लम टू मिल्यनेअर’ या पुस्तकातून प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे झालेला लेखकाच्या संघर्षगाथेची यशोगाथा आहे.

आपण कुठून आलो आहोत ही बाबा स्मरणात ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे, हे पुस्तक गायकवाड यांचे असले तरी याचा मूळ प्रकाशास्त्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज बाबासाहेब असते तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे‎ कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक आणि बिव्हिजी ग्रुपचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड, प्रा. डॉ. वैभव ढमाळ, नोव्हेल स्कूलचे अमित गोरखे, प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे,  लेखक रामकृष्ण गायकवाड, संजना मगर, वासंती गायकवाड, डायमंड पब्लिकेशनचे निलेश पाष्टे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आज पासून सुरुवात

अमित गोरखे म्हणाले, कशाचीही तमा न बाळगता परिस्थिती पाहू झुंज दिली तर यश हमखास मिळते हे रामकृष्ण गायकवाड यांनी दाखवून दिले आहे. या पुस्तकात स्लम चे वास्तव मांडण्यात आले आहे.लेखक रामकृष्ण गायकवाड म्हणाले, बालपण झोपडपट्टीत गेले, 10 बाय 10ची खोली. कॉलेजमध्ये ही मी शांतच असायचो, पण पायात ध्येय पूर्ण करण्याची जिद्द होती.

आज प्रत्येकाने असेच वागायची गरज आहे. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी नकळत आपले प्रयत्न झाले पाहिजेत. ते कोणाला दाखवण्यासाठी नाहीतर स्वतः साठी. मी जेकाही कमवेन ते स्वतः साठी कधीच नसतं. मृत्यू नंतर आपला देहदान करण्याचा संकल्प गायकवाड यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच किमान 100 उद्योजक आणि 500 कुटूंब करोडपती बनवण्याचे स्वप्न असल्याचे ( Pimpri News ) त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजना मगर यांनी केले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.