Pimpri News: रावेत येथील पंम्पिग मशिनरी, पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसची दुरुस्ती

एमपीसी न्यूज – अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथील टप्पा क्र. 1 व 2 योजनेअंतर्गत पंम्पिग मशिनरी दुरुस्तीसाठी 28 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. त्याला स्थायी समिती सभेने आज (बुधवारी) मान्यता दिली.

शहरातील विविध ठिकाणच्या शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसची दुरूस्ती विषयक कामे करण्यात येणार आहे. यामध्ये पिंपळेगुरव आणि दापोडीकरीता 28 लाख, सांगवी गावठाण आणि सांगवीकरीता 26 लाख, रावेत आणि पुनावळेकरीता 29 लाख, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टर व रहाटणीकरीता 29 लाख, थेरगाव गावठाण, थेरगाव आणि लक्ष्मणनगरकरीता 26 लाख, सेक्टर नं. 10 आणि गवळीमाथाकरीता 39 लाख, कृष्णानगर, सेक्टर क्र 22 आणि जाधववाडीकरीता 39 लाख, लांडेवाडी, दिघी, चऱ्होली आणि बोपखेलकरीता 39 लाख रुपये खर्च होणार आहे.

पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्र. 23 निगडी येथील आणि शहरातील विविध पाण्याच्या टाक्यांच्या येथे कार्यान्वित असलेल्या स्काडा प्रणालीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 7 कोटी 12 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधील परिसरात किरकोळ स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करण्यासाठी 24 लाख 87 हजार रुपये खर्च होणार आहेत. पाणीपुरवठा विभागाकडील जलउपसा केंद्र रावेत येथील दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी 88 लाख 66 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत पिंपळे सौदागर येथे पवना नदीवर पिंपरी वाघेरे ते पिंपळे सौदागर येथे जाण्यास सध्या अस्तिवात असणाऱ्या पुलाच्या शेजारी नवीन समांतर पुल बांधण्यात येणार आहे. हे काम नदीपात्रावर होणार असल्याने पुणे पाटबंधारे मंडळाने अटी व शर्तीनुसार या कामास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या ना-हरकत प्रमाणपत्रातील अटीनुसार 25 लाख रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांचेकडे जमा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

पुलाचे काम यशस्वीरित्या आणि व्यवस्थितपणे पूर्ण करून नदीपात्रातील राडारोडा स्वच्छ केल्यानंतर ही अनामत रक्कम पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला परत केली जाणार आहे.

पालिकेच्या स्थापत्य विभागाकडील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ठिकठिकाणी मैला शुद्धीकरण प्रकल्प बांधणे आणि देखभाल दुरूस्ती करण्याकामी 16 कोटी 28 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.