Pimpri News : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ‘प्रजासत्ताक दिन’उत्साहात साजरा 

एमपीसी न्यूज- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’उत्साहात साजरा (Pimpri News) करण्यात आला.यावेळी औंधकॅम्प येथील 24 मराठा लाईट इन्फेनेटी कमांडर सुभेदार बाळासाहेब चौधरी, हवालदार विशाफडतरे,मा.नगरसेविका निर्मला कुटे,संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

 

प्रमुख पाहुणे कमांडर सुभेदार बाळासाहेब चौधरी,पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला.यावेळी माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव,पी.ची.मनपाचे इंजिनीयर विजय कांबळे,प्रमोद गायकवाड,संतोष कापसे,अमोल घोलप,युवराज प्रगणे,मयूर ओहाळ,लाईन्स क्लबच्या अंजुमन सय्यद,प्राजक्ता देशमुख,पौर्णिमा जैन व त्यांचे इतर सहकारी नागेश मंडकी अजय कुलकर्णी,संजय चंद्रकांत गडसे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी (Pimpri News) उपस्थित होते.

यावेळी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.तसेच विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात लेझीम सादर केले, नववी च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले.सहशिक्षिका  निशा पवार, सरला शिंदे,सुमन विश्वकर्मा यांनी आपल्या भाषणातून विषयार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सुनंदा साळवी व आभार कविता वाटेकर मॅडम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.