Pimpri News: शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा द्या, राहुल कलाटे यांना पक्षाचा आदेश

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग आणि पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राहुल कलाटे यांना शिवसेना गटनेते पदाचा राजीनामा देण्याचा आदेश शिवसेना भवनातून दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नुकतीच आठ सदस्यांची निवड झाली. शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. परंतु, गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिले होते. त्यावरुन एक गट आक्रमक झाला होता. त्यांनी पक्षश्रेष्टींकडे तक्रार केली होती.

आपण शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. पक्षाचे आदेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवत आहात. त्यामुळे आपण महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा त्वरित महापौर, विभागीय आयुक्तांकडे  द्यावा, असा आदेश शिवसेना भवनातून कलाटे यांना दिला गेल्याचे सांगितले जात आहे. याला शिवसेनेच्या उपनेत्यांनीही दुजोरा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.