Pimpri News: निर्बंध कडक ! सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही

सिनेमागृह, हॉटेल्स 50 टक्के क्षमतेची मर्यादा; आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने निर्बंध कडक केले आहेत. कोणत्याही सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नसल्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

सिनेमागृह, हॉटेल्स, उपहारगृहे यांना 50 टक्के क्षमतेची मर्यादा देण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

शॉपिंग मॉलमध्ये मास्क परिधान केल्याशिवाय कोणाला परवनागी राहणार नाही. लक्षणे असलेल्यांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात येवू नये. नियमांचे पालन करण्याबाबत मॉल व्यवस्थापनाची जबाबदारी राहील.

कोणत्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक मेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही. लग्न समारंभास 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. अत्यंविधीसाठी फक्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. कोरोना बाधितांना गृह विलगीकरणास परवानगी राहील, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.