Pimpri News: निवृत्त सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांचा गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत 28 फेब्रुवारी 2022 रोजी सेवेतून निवृत्त झाले. शहरातील स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व नागरिकातर्फे लडकत यांचा आज (दि.02)  जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. जेष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुणेरी पगडी, पंचमहाभूतांची फोटो फ्रेम व मानपत्र देऊन लडकत यांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, निगडी येथे हा सत्कार कार्यक्रम पार पडला.यावेळी व्यासपीठावर प्रवीण लडकत यांच्या पत्नी वर्षा लडकत, गिरीश प्रभुणे, डॉ. विश्वास येवले उपस्थित होते‌.

सत्काराला उत्तर देताना प्रविण लडकत म्हणाले, ‘महापालिकेत काम केले नसते तर जे लोक संचित आज मला मिळाले आहे ते कधीच मिळाले नसते. सर्वच स्तरातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला या विश्वासातूनच मला कामाची प्रेरणा मिळत गेली. कुटुंबियांनी मला नेहमी साथ दिली. भविष्यात देखील समाजासाठी काम राहणार,’ असे लडकत यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रवीण लडकत यांची लघु मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

जेष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘लडकत यांचे योग्य नियोजन आणि शहराचा अभ्यास यामुळे पिंपरी चिंचवडला कधीही पाण्याची कमतरता भासली नाही. पंचमहाभूतातील एक तत्व नेहमी सोबत असल्याने त्यांना सर्वांसोबत मिळून मिसळून राहता येत. असे एकनिष्ठ आणि पडद्याआडून काम करणारे अधिकारी अगदी विरळाच असतो. आणि असे अधिकारी कधीच निवृत्त होत नसतात.’

लडकत यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराची सेवा केली आहे. सेवा निवृत्त होत असले तरी विविध कामाच्या माध्यमातून ते जनसेवेत राहणार आहेत. सरकारी अधिकारी यांच्या बद्दल फार कमी चांगल बोललं जातं पण, एवढा मोठा मित्र वर्ग आणि आपुलकी असणारे लोक लकडत यांच्या पाठीशी उभे आहेत हे चित्र फार क्वचित पहायला मिळतं. अशा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिका-याचा सत्कार माझ्या हातून झाला याचा मला विलक्षण आनंद होतो आहे,’ असं गिरीश प्रभुणे म्हणाले.

सायकल मित्र व अविरत संस्थेचे संस्थापक सचिन लांडगे म्हणाले, ‘प्रवीण लडकत यांच्याकडे पाहिले की निस्वार्थी भावनेने काम करणं काय असते याचा परिचय येतो. लडकत पालिका सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांनी सल्ला, मार्गदर्शन आणि विविध मार्गांनी नेहमी कार्यरत रहावे.’

या प्रसंगी जलदिंडी प्रतिष्ठानचे विश्वस्त डाॅ. विश्वासजी येवले यांच्या मनोगत मध्ये पाण्याच्या दोन थेंब जसे एकत्र येतात व मिसळून एकत्र होतात तसे प्रवीण लडकत यांनी सरकारी नोकरी  व सामाजिक बांधिलकी यांची सांगड घातली. लोकांच्या समस्या सर्व प्रकारच्या सीमा ओलांडून पूर्तता केल्या.

प्रवीण लडकत यांच्या कुटुंबीयांनी यावेळी त्यांच्या बद्दल आठवणी आणि अनुभव  सांगितले. प्रवीण लडकत यांनी आत्मचरित्र लिहावे आणि सर्वांसोबत आपला अनुभव शेअर करावा अशी इच्छा पत्नी वर्षा लडकत यांनी यावेळी व्यक्त केली.

मुलगी नेहा आणि मुलगा ओंकार यांनी वडीलांबाबत गोड आठवणींना उजाळा दिला. किनारा वृद्धाश्रमाच्या संस्थापिका प्रीती वैद्य यांनी कोरोना काळात गरीब मुलीला लडकत यांच्या सहकार्यामुळे कशी मदत करता आली, हा प्रसंग उपस्थितांना सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धनंजय शेडबाळे यांनी केले. जल प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.