Pimpri News : टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर आणि सुशीला पारळकर यांना ‘श्यामची आई’ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘श्यामची आई सन्मान’ यावर्षी टाटा मोटर्सचे वरिष्ठ निवृत्त अधिकारी मनोहर पारळकर आणि त्यांच्या आई सुशीला पारळकर यांना देण्यात येणार आहे.

हा गौरव सोहळा 23 सप्टेंबर (गुरुवारी) रोजी सकाळी दहा वाजता राळेगणसिद्धी येथे होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी उद्योजक रंगनाथ गोडसे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे उपस्थित राहणार आहेत. मनोहर पारळकर टाटा मोटर्समधून  वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.

त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला सलाम करत हा पुरस्कार दिला जाणार असून पारळकर यांची आई सुशीला पारळकर यांचा ‘शिस्तबद्ध व संस्कारी माता’ म्हणून सन्मान केला जाणार आहे.

या सोहळ्यात भोसरीतील श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे यांचा साने ‘गुरुजी विचार साधना’ पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

याशिवाय जगन्नाथ शिवले, सुबोध गलांडे आणि श्रीकांत चौगुले यांचा ‘साने गुरुजी शिक्षकप्रतिभा’ पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. सुनिताराजे पवार यांच्या ‘कांडा’ या कांदबरीला ‘सानेगुरुजी बालसाहित्य’ पुरस्कार दिला जाणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.