Pimpri News : निवृत्ती वेतनधारकांना आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार

एमपीसी न्यूज – ईपीएफओ निवृत्ती वेतनधारक दरवर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पीएफ कार्यालयात पेंशन पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करतात. कोव्हिड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने पेंशन धारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

यासाठी बँका, कॉमन सर्व्हिस सेंटरसह, पोस्ट ऑफिस यांच्याशी सक्रिय भागीदारी केली असून, ईपीएफओने या एजन्सिजना जीवन प्रमाणपत्र घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

निवृत्तीवेतनधारकांनी पीएफ कार्यालयांना भेट देण्याचे टाळून त्याऐवजी जवळच्या बँक, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सामान्य सेवा केंद्रावर आधार आधारित बायोमेट्रिक डिजिटल लाइफ सर्टिफिकेट किंवा जीवन (डीएलसी) प्रमाणपत्र सादर करावे अशी विनंती पीएफ कार्यालयाने केली आहे.

निवृत्तीवेतनधारकांना त्यासाठी फक्त त्यांचा मोबाईल, बँक पासबूक, पेंशन पेमेंट ऑर्डर क्रमांक आणि आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनधारक स्थानिक पोस्टमन द्वारे पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून घरातूनच जीवन प्रमाण पत्र ऑनलाइन जमा करू शकतात. पोस्ट ऑफिसद्वारा त्यासाठी नाममात्र फी आकारली जाईल.

ईपीएफओच्या नवीन दिशा निर्देशानुसार जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध राहील. उदाहरणार्थ डिसेंबर 2019 मध्ये सादर केलेले डिजिटल लाइफ प्रमाणपत्र एक वर्षासाठी म्हणजेच डिसेंबर 2020 पर्यंतच्या मासिक पेंशनच्या रिलीझसाठी वैध असेल. म्हणजेच ज्या महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल, तर ते पुढच्या वर्षी त्या महिन्यापर्यंत वैध राहील.

ईपीएस पैंशनधारकांना विना अडथळा लाभ पाऊल उचलले आहे. ईपीएफओ निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतन वितरित बँका, जवळची पोस्ट कार्यालये, सामान्य सेवा केंद्राना भेट देण्यासाठी आणि उमंग ॲपचा उपयोग करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.