Pimpri News : ‘प्रधानमंत्री आवास’ची अनामत रक्कम अपात्र अर्जदारांना परत करा : काशिनाथ नखाते

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची इच्छुकांकडून अर्ज आणि पाच हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार असंख्य इच्छुकांनी अर्ज आणि अनामत रक्क्कम डीडी द्वारे जमा केली. यासाठी काढण्यात आलेल्या सोडत प्रक्रियेत ज्यांचा नंबर लागला नाही. त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांची अनामत रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

याबाबत काशिनाथ नखाते,  राजेश माने, माधुरी जलमुलवार, इरफान चौधरी, महादेव गायकवाड आदींनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी मागील वर्षी  ऑनलाईन अर्ज मागविले होते व त्यासोबत 5हजार रुपयांचा डीडी जमा करण्यास सांगितले होते.

_MPC_DIR_MPU_II

या योजनेसाठी एकूण 47 हजार 878  एवढे अर्ज आले. त्यापैकी 3  हजार 664 अर्ज पात्र केले. अपात्र अर्जदारांची संख्या 44 हजार 214 एवढी असून त्यांचे 5 हजार प्रमाणे अनामत रक्कम 22  कोटी 10  लाख होते. हि रक्कम महापालिकेकडे पडून आहे.

कोरोनामुळे काही कडक निर्णय घ्यावे लागले आहेत. यामुळे श्रमिक, कष्टकरी वर्गाचे उदरनिर्वाहाचे साधन सध्या बंद झाले आहे. हा वर्ग अडचणीत सापडला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोडतीत नंबर न लागलेल्या लाभार्थ्यांची परिस्थिती सध्या बिकट असल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे.  त्यामुळे त्यांच्याकडून अनामत म्हणून घेतलेली रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी नखाते यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.