Pimpri News : ‘प्रश्नमंजुषा’ चर्चासत्राच्या माध्यमातून माहिती अधिकार दिन साजरा

एमपीसी न्यूज – जागृत नागरिक महासंघाच्या वतीने (Pimpri News) ‘प्रश्नमंजुषा’ चर्चा सत्राच्या माध्यमातून माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.

28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन जागृत नागरिक महासंघाने गुगलमीटच्या माध्यमातून साजरा केला. माहिती अधिकार संदर्भात असणारे अनेक प्रश्न व शंका कुशंका यावर प्रश्नमंजुषा चर्चासत्र आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात आला. गुगलमिट चर्चासत्रामध्ये संस्थेचे अध्यक्ष नितीन यादव, सचिव उमेश सणस, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे, ट्रस्टी सतीश घावटे,  सांगवी विभागाचे संभाजी मोरे, राजश्री शिर्के, विजय यादव, चिंचवडचे प्रकाश गडवे, मावळचे संघटक सुनील गुजर, मच्छिंद्र गुजर, कोल्हापूर विभाग प्रमुख सुरेश केसरकर,  अनिता काळे,  माने चौगुले सासने  यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही अधिकारी (Pimpri News) कर्मचारी, मावळचे नायब तहसीलदार चाटे, पीएमपीएमएल मधील अधिकारी बालचिन अशा अनेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या उपक्रमामध्ये नितीन यादव, सुनील गुजर तसेच इतर मान्यवरांनी सहभागींच्या  प्रश्नांचे आणि शंका कुशंकाचे निरसन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.