Pimpri News : पिंपरी उड्डाणपुलाच्या कामासाठी आंबेडकर चौक ते पिंपरी उड्डाणपूल दरम्यानचा रस्ता बंद; वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे टप्प्याटप्प्यात काम करण्यात येणार आहे. गोकुळ हॉटेल ते पिंपरी पूल दरम्यानचे काम उड्डाणपुलाच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. आंबेडकर चौक ते पिंपरी उड्डाणपूल या दरम्यानचा रस्ता आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक रोखण्यात आली असून या मार्गावरील वाहने पिंपरी चौकातून अहिल्यादेवी चौकमार्गे पिंपरी पुलाकडे सोडण्यात आली आहेत. उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामादरम्यान अहिल्यादेवी चौक ते पिंपरी पूल या दरम्यानची वाहतूक दुहेरी मार्गाने राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुलाखाली राहणाऱ्या स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिक यांना क्रोमा शोरूम मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.

आंबेडकर चौकातून पिंपरी उड्डाणपुलाकडे वळणाऱ्या रस्त्यावर बॅरीगेट लावण्यात आले आहेत. पुणे-मुंबई महामार्गाने सरळ जाऊन अहिल्यादेवी होळकर चौकातून डावीकडे वळून नागरिकांना पिंपरी उड्डाणपुलावरून इच्छित स्थळी जाता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like