Pimpri News: उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे फेरवाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि प्रशासन अधिका-यांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे फेरबदल केले आहेत. यानुसार बढती मिळालेल्या उपायुक्तांकडील क्षेत्रीय कार्यालयांचा भार कमी केला आहे.

पालिकेतील चार आणि राज्यसेवेतील दोन सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली आहे. तर, राज्य सेवेतील दोन उपायुक्त पालिकेत कार्यरत आहेत. प्रशासन अधिका-यांना सहाय्यक आयुक्तपदी बढती दिली आहे. त्यानंतर अधिका-यांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे.

सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागासह निवडणूक (आधार कार्ड योजना), प्रशांत जोशी यांच्याकडे भूमी आणि जिंदगी, माहिती व जनसंपर्क विभाग, अण्णा बोदडे यांच्याकडे ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, जनणना, नागरवस्ती विभागाकडील दिव्यांग कक्षाचे कामकाज सोपविले आहे.

प्रशासन अधिकारी सिताराम बहुरे यांच्याकडे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. दिलीप आढारी यांच्याकडे करसंकलन मुख्य कार्यालय, वामन नेमाणे यांना प्रशासन विभागात घेतले आहे.

अवधूत तावडे यांच्याकडे ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. सोनम देशमुख यांच्याकडे ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार, सुचिता पानसरे यांच्याकडे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त पदभार, अभिजीत हराळे यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार, राजेश ठाकर यांच्याकडे ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे.

कार्यालयीन अधिक्षक नाना मोरे यांच्याकडे ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. प्रभारी प्रशासन अधिकारी परशुराम वाघमोडे यांच्याकडे बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम परवानगी विभागासह स्थानिक संस्था कर विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाची जबाबदारी सोपविली आहे.

उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार कमी केला असून करसंकलन व अभिलेख विभागाची जबाबदारी कायम ठेवली आहे. चंद्रकांत इंदलकर यांच्याकडील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काढून कामगार कल्याण व कायदा विभागाच्या कायदा सल्लागार या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

संदीप खोत यांच्याकडे क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्याकडील झोनिपू विभाग काढला असून त्यांच्याकडे स्थानिक संस्था कर विभागाचे कामकाज दिले आहे.

प्रशासन अधिकारी राजेश आगळे यांना सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती दिली आहे. त्यांच्याकडे झोनिपू विभागाच्या कामकाजासह प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त कामकाज सोपविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.