Pimpri News: रॅपिड अँटीजेन टेस्ट किटसाठी साडेसात कोटी

पिंपळे-सौदागर येथील पवना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 12 कोटी 31 लाख रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा सर्वत्र फैलाव झालेला असल्याने त्याचा प्रादुर्भाव पिंपरी- चिंचवड शहरामध्ये वाढतच आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी ऑटोक्लस्टर येथील 150 बेडस् व 50 आयसीयू बेड्ससाठी व रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी लागणारे किट्स यासाठी 7 कोटी 48 लाख रकमेच्या खर्चासह विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे 65 कोटी 23 लाख रकमेच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

पिंपळे-सौदागर येथील पवना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 12 कोटी 31 लाख रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे, महाकाय दुर्बिणीचे जनक गोविंद स्वरुप, माजी नगरसेवक साहेबराव खरात, तसेच कोरोनामुळे मृत्यू पावलेले शहरातील नागरिक व पालिका कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.