Pimpri News: ‘आरएसएस’च्या पुढाकाराने रॅपिड अँटीजन टेस्ट शिबिरात 592 जणांची मोफत चाचणी

या शिबिरात एकूण 592 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 45 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना पालिकेच्या डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता मार्गदर्शन केले आहे.

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने कोरोना संसर्ग निवारण महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. याअंतर्गत पिंपरी बाजारातील व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना रॅपिड अँटीजन शिबिरात 592 जणांची मोफत चाचणी करण्यात आली. त्यापैकी 45 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभियानाअंतर्गत पिंपरी कॅम्पमध्ये प्रथम टप्यात सर्व व्यापाऱ्यांकरिता स्क्रिनिंग अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. पुढील टप्प्यात या सर्व व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांकरिता महानगर पालिकेतर्फे श्री झुलेलाल मंदिरात 14,15 व 16 ऑगस्ट रोजी कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट शिबीर घेण्यात आले.

या शिबिरात एकूण 592 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 45 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना पालिकेच्या डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता मार्गदर्शन केले आहे.

भोसरीतही 3 दिवसीय मोफत रॅपिड अँटीजन शिबिर आयोजित केले असून आजपर्यंत एकूण 340 जणांची चाचणी करण्यात आली व त्यापैकी 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

भोसरी येथील सखुबाई गबाजी गवळी उद्यान याठिकाणी सुरू असलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अभियानाचे प्रमुख बाळासाहेब लोहकरे यांनी सांगितले आहे.

या शिबिरासाठी महानगर पालिकेच्या वैद्यकीय पथकाला सुमारे 25 कार्यकर्त्यांनी आयोजन करून सहकार्य केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.