Pimpri News: माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक आणि संतोष बेंद्रे यांना धमकीचे फोन

कामगार कायदा उल्लंघन व कामगार सुरक्षेला प्राधान्य न दिल्यामुळे मुंगी इंजिनियर्स या कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवगर्जना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी सोमवारी (दि.7) पत्रकार परिषद घेतली होती.

एमपीसी न्यूज – कामगार कायद्याचे उल्लंघन व कामगारांची सुरक्षा या विषयी विविध आरोप करत मुंगी इंजिनियर्स या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी शिवगर्जना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्यानंतर विविध धमकीचे फोन येत असल्याबाबतचा तक्रार अर्ज संतोष बेंद्रे व प्रदीप नाईक यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे सादर केला आहे.

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विविध प्रकारच्या धमकीचे फोन आम्हाला येत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी या निवेदनात केली आहे.

दरम्यान, कामगार कायदा उल्लंघन व कामगार सुरक्षेला प्राधान्य न दिल्यामुळे मुंगी इंजिनियर्स या कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवगर्जना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी सोमवारी (दि.7) पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर त्यांना धमकीचे फोन येत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.