Pimpri news: सत्ताधारी भाजपचा व्यापाऱ्यांना पाठिंबा; शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचे व्यापाऱ्यांना पत्र

0

एमपीसी न्यूज – अगोदरच आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने व्यापा-यांना पाठिंबा दिला आहे. भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी व्यापा-यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला पिंपरी मर्चंट फेडरेशनने तीव्र विरोध दर्शविला आहे. पिंपरी कँम्पमध्ये व्यापा-यांनी रॅली काढून निदर्शने केली. यावेळी व्यापा-यांनी लॉकडाऊन विरोधात फलक झळकवले आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

पिंपरी मर्चंट फेडरेशनचा लॉकडाऊनला असणारा विरोध योग्य आहे. त्यास पिंपरी-चिंचवड भाजपाचा पाठिंबा असल्याचे भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे पत्र आंदोलन स्थळावर येऊन फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांना देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, भाजपा शहर सरचिटणीस अमोल थोरात, माजी नगरसेवक राजू दुर्गे, प्रसिध्दी प्रमुख संजय पटनी आदी उपस्थित होते.

आंदोलनानंतर फेडरेशनच्या शिष्टमंडळाने आपले निवेदन महापालिका प्रशासनाला दिले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटाबंदी, जीएसटीमुळे सर्व व्यापारी वर्ग, उद्योजक, व्यावसायिक आर्थिक मंदिचा सामना करीत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील वर्ष लॉकडाऊन व ‘मिशन बिगिन अगेन’मध्ये गेले. आता कुठे उद्योग व्यवसाय पुर्वपदावर अशंत: येत असताना पुन्हा दुकाने बंद करने हे सर्व व्यापा-यांवर अन्यायकारक आहे.

व्यापारी प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यास बांधिल आहेत. मात्र, प्रशासनाने व्यापा-यांशी याबाबत चर्चा करावी व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment