Pimpri News: कोविड समर्पित ‘वायसीएम’मधील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे यांचे कोरोनामुळे निधन

वायसीएममधील चाणक्य विभागात कार्यालयीन अधिक्षक असलेल्या साईनाथ लाखे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे (वय 57) यांचे आज (बुधवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना वायसीएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित घोषित केले आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. कोरोनामुळे पालिकेचे एक शिक्षक, उपलेखापालाचा मृत्यू झाला आहे.

वायसीएममधील चाणक्य विभागात कार्यालयीन अधिक्षक असलेल्या साईनाथ लाखे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला वायसीएम रुग्णालयातच उपचार सुरू होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.