Pimpri News : हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाची निदर्शने

एमपीसीन्यूज : उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी समाजवादी पक्षाच्यावतीने पिंपरी येथे  जोरदार निदर्शने करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी  केंद्र व उत्तर प्रदेश सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच हाथरस प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

यावेळी समाजवादी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रफीक कुरेशी यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. समाजवादी पार्टीचे शहर प्रवक्ते प्रा. नरेंद्र पवार, तसेच राजेश नागोसे, शादाब चौधरी, लक्ष्मण पांचाळ आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.