Pimpri News: एकता विकास मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप आंबवणे

एमपीसी न्यूज – पिंपरी, संत तुकारामनगर येथील एकता विकास मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप आंबवणे यांची बिनविरोध निवड झाली. ऐन गणपती उत्सवात निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.

मंडळाची नुकतीच सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. यावेळी कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी संदीप आंबवणे, उपाध्यक्ष सुशील शेलार, कार्याध्यक्ष गणेश मांढरे, उपकार्याध्यक्ष आकाश भोसले, खजिनदार सागर जगताप, उपखजिनदार अखिल शिंदे, सचिव निलेश पाटील, सहसचिवपदी प्रतिक महाजन यांची निवड झाली आहे.

नागरिकांनी गणपती पूजन करुन कार्यकारणीचे अभिनंदन केले. अध्यक्ष संदीप आंबवणे हे उच्चशिक्षित असून त्यांची सामाजिक कार्य करण्याची आवड आहे.  क्रीडा व विविध विषयांची पुस्तके वाचन, विविध क्षेत्रातील लोकांशी विचार विनिमय करण्याची आवड आहे.

यावेळी ज्येष्ठ नागरिक रविंद्र शाह, निवृत्ती गायकवाड, धर्माजी आंबवणे, विनायक चक्रे, माळी, कृष्णन, कु-हाडे आदी उपस्थित होते. ज्येष्ठांनी कार्याकारिणीचे अभिनंदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.