Pimpri News : ‘सर्जा-राजा’ बैलजोडी छायाचित्र स्पर्धेत संजय पवार यांची बैलजोडी प्रथम

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सर्जा-राजा’ बैलजोडी छायाचित्र स्पर्धेत खेड तालुक्यातील संजय जगन्नाथ पवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातून या स्पर्धेत दोनशेहून अधिक बैलजोडींनी सहभाग घेतला होता. 

‘सर्जा-राजा’ बैलजोडी छायाचित्र स्पर्धेत नामदेव पंढरीनाथ डुबे यांच्या बैलजोडीने दुसरा तर विशाल गबाजी आंद्रे यांच्या बैलजोडीने तिसरा क्रमांक पटकवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवासाठी पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या वतीने ऑनलाईन बैलजोडी छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. घरी साजरा होणाऱ्या पोळा सणाच्या निमित्ताने सजवलेल्या बैलजोडीचा एक फोटो आणि विडियो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. पशुधन व मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भाजयुमो जिल्हा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण व शिरुर तालुका भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अनिकेत राक्षे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.