Pimpri News : संकेत भोंडवे यांच्या पुस्तकाने ‘आयएएस’मध्ये मराठी अधिकाऱ्यांचा टक्का वाढेल- नितीन गडकरी

एमपीसीन्यूज : आयएएस अधिकाऱ्यांमध्ये इतर अन्य राज्यातील तरुण मोठ्या संख्येने दिसून येतात. मात्र संकेत भोंडवे यांनी लिहिलेल्या ‘IAS सेवेची पाऊलवाट या पुस्तकाने दिल्लीमध्ये मराठी अधिकाऱ्यांचा टक्का वाढेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

केंद्रीय प्रशासकीय अधिकारी व केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री यांचे खासगी सचिव श्री. संकेत भोंडवे लिखित ‘IAS सेवेची पाऊलवाट- भारतीय प्रशासकीय सेवेचा दशकाचा प्रवास’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी श्री. गडकरी बोलत होते.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला पुण्याचे पुण्याचे माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती पी डी पाटील, विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आदी उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, “लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी प्रशासन हा महत्वाचा स्तंभ आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलता हे गुण असणे फार महत्वाचे आहे. प्रशासकीय अधिकारी हे पद फक्त शोभेचे किंवा मानाचे नसून या माध्यमातून समाजातील पीडित, शोषित, निराधार लोकांना मदतीचा हात देणे, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रशासकीय अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे.

त्यासाठी प्रसंगी कायदा मोडावा लागला तरीही ते क्षम्य आहे असं गडकरी म्हणाले. संकेत भोंडवे यांना त्यांच्या वडिलांचा वारसा मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. त्यातूनच त्यांनी मध्यप्रदेशमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले”

श्री. गडकरी म्हणाले की, आयएएस अधिकाऱ्यांमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातील तरुण मोठ्या संख्येने दिसून येतात. मात्र आयएएस परीक्षेसाठी मराठी तरुण फार कमी संख्येने दिसून येतो. मराठी तरुणांना गरज आहे ती मार्गदर्शनाची. संकेतच्या पुस्तकामुळे मराठी तरुणाला आयएएस परीक्षेसाठी प्रेरणा मिळेल. त्यातूनच जास्तीतजास्त मराठी तरुण प्रशासकीय नोकरीकडे वळून दिल्लीमध्ये मराठी अधिकाऱ्यांचा टक्का वाढेल असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.

श्री. संकेत भोंडवे आपल्या पुस्तकाबद्दल करताना म्हणाले की, मी काही लेखक नाही. पण या पुस्तकाने मला लेखक बनवले. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मी एकाच संदेश देईन की, जिद्द, चिकाटी, परिश्रम, आत्मविश्वास, आणि सुयोग्य मार्गदर्शन या माध्यमातून तुम्ही यश प्राप्त करू शकता.

आयएएस सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही समाजातील कमजोर, दुर्बल घटकांसाठी तुम्ही नाविन्यपूर्ण रीतीने खूप काही करू शकता. सर्वसामान्यांचे आयुष्य बदलण्याची ताकद कलेक्टर, कमिशनर या पदांमध्ये असते. या पुस्तकातून तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन मिळेल. एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहीन, अशी ग्वाही श्री. भोंडवे यांनी दिली.

यावेळी दिलीप बंड व पी. डी. पाटील यांनी देखील आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘IAS सेवेची पाऊलवाट- भारतीय प्रशासकीय सेवेचा दशकाचा प्रवास’ ही चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. तर आभार विशाल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.