Pimpri news : संत तुकाराम व्यापारी संकुला जवळील रस्त्यावर लागणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाड्या कधी हलवणार?

एमपीसी  न्यूज :  निगडी येथील संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील रस्त्यावर लागणाऱ्या अनधिकृत खाद्यपदार्थांच्या हातगाड्या पिंपरी-चिंचवड मनपा शाहुनगर सारखा अपघात झाल्यानंतर हलवणार का?? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. 

अथर्व रवींद्र आळणे, वय 11 वर्षे, रा. साहिल रेसिडेन्सी, स्पाईन रोड, मोशी या शालेय विद्यार्थ्याचा काल गुरुवारी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने मृत्यू झाला होता. त्याची आई त्याला दुचाकीवरून शाळेला सोडायला जात असताना शिवनगर येथे एका मोटारीने त्यांच्या दुचाकी ला धडक दिल्याने दोघे खाली स्त्यावर पडले व अथर्व हा ट्रकच्या खाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. या रस्त्यावर जड वाहने पार्क केली असतात व पथारीवाले सुद्धा रस्त्यावर असतात त्यामुळे वाहनांना जाण्यासाठी कमी रस्ता असतो. या रस्त्यावरील जड वाहनांच्या वर्दळी मुळे सिमेंट ब्लॉक खचल्याने खड्डा पडून तो अपघात घडला.

तशीच काहीशी परिस्थिती निगडी येथे आहे. पुणे – मुंबई महामार्गवरील टिळक चौक ला लागून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संत तुकाराम व्यापारी संकुल आहे. त्याच्या शेजारीच टिळक चौक हून भेळ चौका कडे रस्ता जातो. या  रस्त्यावर व्यापारी संकुला बाहेर अनेक खाद्य पदार्थांच्या हातगाड्या पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत लागलेले असतात. या हात गाड्यावरील खाद्य पदार्थ खाण्यासाठी निगडी व आकुर्डी परिसरातील कॉलेजचे विद्यार्थी (Pimpri news)  व नागरिक येत असतात. हे खवय्ये त्यांच्या दुचाकी वाहने या हातगाड्यांच्या समोर रस्त्यावर लावतात. त्यामुळे मुलांना, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना तसेच मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. यामुळे पादचाऱ्यांना वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शक्यता आहे.

NCP Protest : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शाहूनगर येथे झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

या हातगाडीवाल्यांना मनपाने टिळक चौक मधील असलेल्या मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली जागा दिली होती. काही काळ ते तेथे गेले पण परत तेथून ते मुळ जागी आले आहेत.

याबाबत चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिकांना संघ म्हणाले की, “हा एक निगडी मधील ज्वलंत प्रश्न आहे. हातगाडीवाले  त्यांच्या ग्राहकांच्या अवैध वाहन पार्किंग मुळे पादचारी रस्त्याच्या मधून जीव मुठीत धरून चालतात. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होते. टिळक चौकातील सिग्नल सुटला की वाहने भरधावं वेगाने येतात त्यामुळे अपघात होऊन पादचारी गंभीर जखमी होऊ शकतात किंवा कोणाचा जीव ही जाऊ शकतो.”

जोशी पुढे म्हणाले की, “हातगाडीवाले त्यांचे उरलेले खाद्य पदार्थ रस्त्यावरच टाकतात त्यामुळे दुर्गंधी पसरते. तसेच त्यामुळे भटकी कुत्री तेथे हे फेकलेले अन्न खाण्यासाठी येतात. त्यामुळे ते पादचाऱ्यांना चावू शकतात.(Pimpri news) हातगाड्यांवरील खाद्य पदार्थ खाण्यासाठी येणारे बरेच ग्राहक धूम्रपान करतात त्यामुळे पादचाऱ्यांना प्रदूषित वायूचा त्रास सहन करावा लागतो.”

जोशी यांनी मागणी केली की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हौकर्स झोन निर्माण करावेत. संत तुकाराम व्यापारी संकुल जवळील अनधिकृत हातगाड्यांना हटवून त्यांना हौकर्स झोनमध्ये हलवावेत. त्यांच्याकडून कमी डिपॉजिट व भाडे आकारावे. त्यामुळे हातगाडीवाले तेथे जातील व त्यांचा व्यावसाय करतील

रवींद्र सातपुते म्हणाले की, “मी नेहमी संत तुकाराम व्यापारी संकुल जवळून जात असतो. येथे हातगाड्या व त्यासमोरील ग्राहकांच्या वाहणांमुळे रस्ता अरुंद होतो. त्यामुळे पादचऱ्यांना रसत्याच्या मधून चालावे लागते. यामुळे वाहनांना जायला खूप थोडी जागा राहते. पूर्वी महानगरपालिकेने या हातगाडीवाल्यांना जवळच्या उड्डानपुलाखाली हलवले होते. त्यामुळे काही दिवस रस्ता मोकळा झाला होता. आता परत हातगाडीवाले आल्याने लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर हातगाडीवाल्यांना पुन्हा जवळच्या उड्डाणपूलखाली लावून वाहनांसाठी रस्ता मोकळा करावा.”

स्मिता शिंदे म्हणाल्या की, “पादचाऱ्यांना व्यापारी संकुलसमोरील रस्त्याने पायी जाताना जीव मुठीत धरून जावे लागते. नेहमी भीती असते की मागून सिग्नल सुटल्यावर वाहन सुसाट येऊन धडक देईल की काय? मनपा कोणाचा तरी जीव गेल्यावरच जागी होऊन येथील हातगाडीवाल्यांना हलवणार आहे का??”

संदिप नाईक म्हणाले की, “आम्ही पिंपरी चिंचवड नागरिक मनपला वेळेवर टॅक्स भरतो चांगले रोड व इतर सोई सुविधा देण्यासाठी. या रुंद रस्त्याचा उपयोग फक्त हातगाडीवाले यांनाच होत आहे. मनपाने एवढा रुंद रोड बनवला आहे पण तो वाहनांना वापरता येत नाही. येथुन लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक पायी जातात अपघात होऊन पादचाऱ्याचा भीषण अपघात होऊन कुणाचा तरी जीव जाण्यापूर्वी येथील हातगाड्यांना हलवावे.”

याबाबत सुचेता पानसरे, अ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना गेल्या (Pimpri news) 15 दिवसात दोनदा विचारले असता त्यांनी हातगाडीवाल्यांना जवळीलच उड्डाणंपूलाखाली स्थलांतरीत करणार असल्याचे सांगितले होते. पण अजूनही त्यांना स्थलांतरीत करण्यात आले नाही.

त्यामुळे प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त- 1, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना सपंर्क केल्यावर त्यांनी सांगितले की तात्काळ कारवाई करू.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.