Pimpri news: ‘असे’ केले जाणार सार्स कोवी – 2 सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने अ‍ॅण्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण’ मोहिम हाती घेण्यात येणार आहे.

# हे सर्वेक्षण 12 वयोगटावरील व्यक्तींमध्ये करण्यात येईल.

# झोपडपट्टी, दाटीवाटीच्या वस्त्या आणि इतर विभागांमधून 5 हजार नमुने गोळा केले जातील.

# 5 हजार नमुन्यांमधून अ‍ॅन्टिबॉडीज (प्रतिपिंडे) चे निदान केले जाईल.

# किती जणांच्या शरिरात कोरोना अ‍ॅन्टिबॉडीज तयार झाल्या आहेत हे तपासले जाईल.

# अ‍ॅन्टिबॉडीजच्या निदानावरुन कोविड संसर्ग संक्रमणाचा कल समजून घेता येईल.

# यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कामगारांचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जाईल.

याबाबत बोलताना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”सार्स – कोवी 2 विषाणू प्रसाराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणा अंतर्गत संमती देणा-या पाच हजार नागरिकांचे रक्त नमुने गोळा केले जाणार आहेत. कोरोना विरोधाच्या लढ्यात सार्स कोवी – 2 सर्वेक्षण हे एक महत्वाचं अस्त्र ठरणार आहे. कोरोनाचं संकट नेमके कुठवर फैलावले आहे, याची माहिती याद्वारे मिळणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.