Pimpri News : सावित्रीबाई फुले-राजमाता जिजाऊ संयुक्त जयंती उत्साहात साजरी

मुख्याध्यापिकांचा व आदर्श मातांचा गौरव

एमपीसी न्यूज: लायन्स क्लब ऑफ पिंपरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती ‘महिला शिक्षक दिन’ म्हणून रविवारी (दि. 10) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर परिसरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापिकांचा व आदर्श मातांचा गौरव करण्यात आला.

महापौर उषा ढोरे, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबचे उपप्रांतपाल एमजेएफ लायन्स हेमंत नाईक, जयहिंद हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका जोतिका मलकानी, माजी प्रांतपाल लायन्स हरिदास नायर तसेच शैलजा सांगळे, जोतिबा उबाळे, सागर भोईटे, राजेंद्र टिळेकर, आनंदा कुदळे, मनू जेठवाणी, दौलत कटारिया, लक्ष्मी पानीकर, दिपा जाधव, मारुती मुसमाडे, वसंतकुमार गुजर, दिलीपसिंह मोहीते, समिक्षा मंधान आदी उपस्थित होते.

यावेळी माया सावंत (सिटी प्राईड शाळा), मृदुला महाजन (डॉ. डि. वाय पाटील पब्लिक स्कूल), स्मिता धुमाळ (पुणे जिल्हा परिषद, प्राथमिक विद्यालय, करंजविहीरे), ज्योती मसंद (जयहिंद हायस्कूल), गीता पिल्ले (डि. वाय पाटील ज्ञानशांती स्कूल) या मुख्याध्यापिकांचा ‘सावित्रीबाई फुले आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला.

तसेच साधना जाधव (क्रिकेटपटू ऋतूराज जाधव यांची आई), सविता ताम्हाणे (डॉ. विजय ताम्हाणे व डॉ. किर्ती यांच्या आई), सुमन वाघेरे (नगरसेवक संदिप वाघेरे यांच्या आई) यांना ‘राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये महापौर उषा ढोरे व उपप्रांतपाल हेमंत नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले. सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आम्ही आहोत. त्या नसत्या तर आम्हीही आज येथे नसतो, असे मत माजी मुख्याध्यापिका शैलजा सांगळे यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नेहूल कुदळे यांनी केले. सूत्रसंचालन मोनिका मंधान व भारती कुदळे यांनी केले. जोतिका मलकानी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.