Pimpri Vaccination News : ‘कोविशिल्ड’ लशीची टंचाई; मंगळवारी 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 4 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे. ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या कोविशिल्ड लस मिळणार नाही.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नवीन जिजामाता रुग्णालय आणि फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन ॲपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

तर, 45 वर्षांपुढील नागरिकांना सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा या केंद्रांवर 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.