Pimpri News : बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटीसाठी ‘पोर्टा केबिन’मध्ये भरणार स्कूल

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी व पिंपरी- चिंचवड महापालिका (Pimpri News) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटी बनवण्यासाठी त्यांना पोर्टा केबिन हॅप्पी स्कूल बनवून देण्याचा असा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. या कामी जनसेवा फाउंडेशन पुणे यांचा महत्त्वाचा सहयोग राहणार आहे.

जनसेवा फाउंडेशनच्या शिक्षिका अनेक वर्षापासून या वाडी वस्तीतील मुलांना उघड्यावर शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. पाऊस, ऊन अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या शाळा घेणे त्यांना कठीण होत असल्याचे रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष संजय प्रधान यांच्या निदर्शनास आले. दिवाळी दरम्यान गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व फराळाचा वाटप करण्यानिमित्त्याने गेले असता त्यांची या वस्तीतील मुलांशी व तिथे शिकवत असलेल्या महिला शिक्षकांसाठी ओळख झाली. या नैसर्गिक अडचणी लक्षात घेऊन  प्रधान यांनी हॅप्पी स्कूल पोर्टा केबिन मध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था करून देण्याची कल्पना मांडली.

31 मार्च रोजी तुकाराम मासुळकर पथ पिंपरी येथे प्रथमच अशा प्रकारची ह्प्पी स्कूल सुरू करण्यात आले आहे. महिला शिक्षकांसाठी स्वतंत्र टाॅयलेट देखील केले आहे. महापालिका  आयुक्त  शेखर सिंह यांच्या हस्ते या (Pimpri News) हॅप्पी स्कूलचे उद्धाटन करण्यात आले. त्याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय प्रधान, महानगरपालिकेचे उपआयुक्त चंद्रकांत इंदालकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदाडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे,अनिरुद्ध प्रधान, मधुरा प्रधान,  संयुक्ता प्रधान, डिस्ट्रिक्ट फाउंडेशन डायरेक्टर नितीन ढमाले बिमल रावत,बप्रकाश जेठवा, श्याम अगरवाल , परमानंद जमतानी, नरेंद्र सेठी,  डॉ विभा झुत्षी, सदानंद नायक, रमेश कचरू, रोहन रोकडे, संतोष गिरनजे, आनंद संपत, कुशल शहा, महेश चांडक, सूर्यकांत जाधव, एन प्राची जाधव, एन.ख्याती शहा, एन.मीना गुप्ता, सलोनी गुप्ता, खियाना गुप्ता,  जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, दीपिक्षा चौबे, भारती, मेघा व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या.

Pune : संजय राऊत सच्चा शिवसैनिक – विजय शिवतरे

अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी 35 मुलं उपस्थित होते. रोटरी तर्फे त्यांना युनिफॉर्म, बॅग्स, वॉटर बॅग, दोन वह्या, पेन्सिल यांचे देखिल वाटप करण्यात आला. लवकरात लवकर शहराच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या पोर्टा हॅपी स्कूल ची व्यवस्था करण्यात येईल, असे अध्यक्ष  संजय प्रधान यांनी सांगितले. बाल भिकारी मुक्त स्मार्ट सिटी साठी प्राथमिक शिक्षण, औषधे, व पोषण या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याकामी सीएसआर व आंतरराष्ट्रीय फंडिंगनद्वरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.