Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत राहणार बंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालये 3 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यानच्या कालावधीत शहरातील शाळा-महाविद्यलयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी, शाळांचे निर्जंतुकीकरण आणि अन्य खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा महाविद्यालये 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या आदेशाला वाढ देऊन शाळा सुरु करण्याची मुदत 3 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शाळा महाविद्यालयातील नववी ते बारावीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या 100 टक्के उपस्थितीसाठी कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच पालकांचे संमतीपत्र भरून घेणे, शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, तापमान मोजणीसाठी गण, थर्मामीटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत व्यवस्था करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 3 जानेवारी 2021 पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.