Pimpri news: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू

एमपीसी न्यूज – विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून कलाम 144 लागू राहणार असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून 1 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.

ही निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावारणात पार पाडणाच्या दृष्टीकोनातून शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात वापर करण्यास निर्बंध घालण्यात येत आहेत.

निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी संबंधित पक्षांची चित्रे, चिन्हांचे कापड फलक, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.

निवडणूक कालवधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय आधिकारी कार्यालय, सर्व तहसिल कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका काढणे, मोर्चा काढणे, सभा घेणे उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे वाद्य वाजविणे व गाणी म्हणणे इत्यादी, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यांना बंदी घालण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

निवडणूक कालावधीत प्रचारादरम्यान कोणत्याही वाहनांच्या ताफयामध्ये 5 पेक्षा जास्त मोटारगाडया अथवा वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.

सदरचा आदेश संरक्षण वाहनांच्या ताफ्यासह केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री किंवा उच्च पदस्थ व्यक्ती घेवून जात असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेविषयी लागू असलेल्या आदेशात अधिन राहून अंमलात राहिल व शासकीय कामावर असलेल्या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.

निवडणूक कालावधीत कोणतीही व्यक्ती संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाउड स्पीकरचा ) वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये. ध्वनीक्षेपकाचा वापर कोणत्याही प्रकारे सकाळी 6 वाजलया पुर्वी व रात्री 10 वाजल्यानंतर करता येणार नाही.

निवडणूक कालावधीत सर्व धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणीच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापित करता येणार नाहीत. सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असे पोलीसआयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.