Pimpri News : ‘ सेवा विकास’ बँकेच्या अध्यक्षपदी ॲड. विजयकुमार रामचंदानी यांची निवड

एमपीसी न्यूज : पिंपरी येथील दि सेवा विकास को ऑप बँक ली.च्या (The Seva Vikas co opp. Bank Ltd) अध्यक्षपदी  (chairman) ॲड. विजयकुमार रामचंदानी ( Ad. Vijaykumar Ramchandrani) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बँकेच्या संचालक मंडळाची सभा (Bank Director meeting ) बुधवारी (दि. 27) बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. या सभेत अध्यक्षपदी ॲड. रामचंदानी यांचीएकमताने निवड करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

सहकारी संस्था पुणे शहर तीनचे उपनिबंधक शाहूराज हिरे आणि सर्व संचालक यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. तसेच बँकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा सूर्यवंशी देखील यावेळी उपस्थित होत्या.

ॲड. रामचंदानी हे सन 2015 पासून बँकेचे संचालक आहेत. ते वकिली, सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ॲड. रामचंदानी हे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास सर्व संचालक मंडळाने व्यक्त केला.

सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन ते बँकेची उत्तम प्रकारे धुरा सांभाळतील. बँकेला आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतील, असाही विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1