Pimpri News: स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, स्थायी समिती अध्यक्षांसह इतरांचीही निवड

Pimpri News: Selection of Divisional Commissioner, Commissioner of Police, Standing Committee Chairman and others on the Board of Directors of Smart City पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत रिक्त झालेल्या जागी नवीन संचालकांना घेण्यात आले.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळावर पुण्याचे नूतन विभागीय आयुक्त आयुक्त सौरभ राव, पिंपरीचे पोलीस आयुक्त बिष्णोई, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय अध्यक्ष, संचालक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सभागृह नेते नामदेव ढाके यांची निवड करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड संचालक मंडळाची दहावी बैठक तब्बल नऊ महिन्यांनी गुरुवारी (दि.13) झाली. ऑटो क्लस्टर – चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत रिक्त झालेल्या जागी नवीन संचालकांना घेण्यात आले.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यात पुण्यासह पिंपरी – चिंचवड शहराचाही समावेश आहे. ही योजना राबविण्याकरिता पिंपरी पालिकेकडून 13 जुलै 2017 रोजी पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वहन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

कंपनीच्या संचालक मंडळावर माजी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या जागी नवीन विभागीय आयुक्त सौरभ राव, माजी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या जागी आयुक्त संदीप बिष्णोई, पीएमपीएलच्या माजी व्यवस्थापकीय अध्यक्षा, संचालिका नयना गुंडे यांच्या जागी राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या जागी स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या जागेवर विद्यमान सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांना घेण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.