Pimpri News: पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर निधी, महानगरपालिकेने मागविले अर्ज

पथ विक्रेत्यांना दहा हजार रूपये प्रोत्साहनपर कर्ज देणे, कर्ज परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे तसेच डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

एमपीसी न्यूज – पथविक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. पथविक्रेत्यांना मदत म्हणून दहा हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिकेने त्यासाठी अर्ज मागविले आहेत.

देशात कोरोना हा संसर्गजन्य आजाराने थैमान घातले. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला त्यामुळे अनेकांचे रोजगार सुटले तर पथारी व पथ विक्रेत्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा आर्थिक अडचणीत सापडलेल्या पथविक्रेत्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे.

पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. पथ विक्रेत्यांना दहा हजार रूपये प्रोत्साहनपर कर्ज देणे, कर्ज परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे तसेच डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

_MPC_DIR_MPU_II

pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर योजनेचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. याअंतर्गत संबंधित अर्ज भरणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन हा अर्ज नागरिकांना भरता येऊ शकतो.

योजनेचा लाभ

नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्ताने परतफेड करण्यास पात्र असतील.

या कर्जावर RBI च्या प्रचलित दराप्रमाणे व्याज दर लागू राहतील.

विहित कालावधीमध्ये कर्ज परतफेड केल्यास 7% व्याज अनुदान मिळण्यास पात्र.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.