Pimpri News: ‘बदलीसाठी पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी पाठवा’

प्रशासन विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांचे विभागप्रमुखांना परिपत्रक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते ‘ड’ मधील एप्रिल व मे महिन्यात बदलीसाठी पात्र ठरणा-या अधिकारी, कर्मचा-यांची यादी पाठवावी. तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असेल, त्यांचे अर्जही विभागप्रमुखांनी 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रशासन विभागाकडे पाठवावेत. याबाबतचे पत्रक प्रशासन विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांनी विभागप्रमुखांना पाठविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण 2011 साली तयार करण्यात आले आहे.

एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्‍तिक व वैद्यकीय कारणास्त बदली हवी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविण्यात यावी.

18 फेब्रुवारीपर्यंत विभागप्रमुखांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रशासनाकडे यादी पाठवावी. मुदतीनंतर आलेले अर्ज प्रशासन विभागामध्ये स्वीकारले जाणार नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

त्याचबरोबर ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी बदली मिळण्याबाबतचा विभागामध्ये दाखल केलेला अर्ज संबंधित विभागाने प्रशासनास पाठविला नाही. त्याबाबत तक्रारी दाखल झाल्यास विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, मागीलवर्षी बदल्यांबाबत अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचा-यांच्या शासनाच्या मार्गदर्शनानुसार बदल्या केल्या नाहीत. ज्या अधिकारी, कर्मचा-यांनी 23 जानेवारी 2020 मध्ये बदलीसाठी केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे बदलीसाठी पुन्हा मुदतीत अर्ज करावे लागणार आहेत.

‘यांच्या’ केल्या जाणार बदल्या !

गट ‘अ’, ‘ब’ मधील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता एकाच विभागात काम करावयाचा कालावधी तीन वर्ष राहील. त्यानंतर त्यांची बदली केली जाते. गट ‘क’ मधील कर्मचा-यांकरिता एकाच विभागात काम करण्याचा कालावधी सर्वसाधारणपणे सहा वर्ष राहील. तथापि, तीन वर्षानंतर कर्मचा-यांकडील कामकाज विषय विभागातंर्गत बदलण्यात यावे. गट ‘अ’ ते गट ‘क’ मधील बदलीस पात्र अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात केल्या जातात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.