Pimpri News: शिवसेनेतर्फे फळविक्रेत्यांची मोफत कोरोना चाचणी, तिघे पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – दिवाळी सणानंतर कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेवून शिवसेना पिंपरी विभागाच्या वतीने पिंपरी मार्केटमधील 150 फळ, मसाले विक्रेत्यांची मोफत कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.

पालिकेच्या जिजामाता रुग्णालयाच्या सहकार्याने शिवसेना पिंपरी विधानसभा संघटक रोमी संधू यांच्या कार्यालयात तपासणी शिबिर पार पडले. शहरप्रमुख योगेश बाबर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

शिवसेना कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, विभागप्रमुख सोनू संधू, उपविभाग प्रमुख बबलू शेखर, जिजामाता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरुमली, डॉ. शिंगाडे, डॉ. निखील जाधव, डॉ. गणेश जाधव, डॉ. मनिष डोईफोडे उपस्थित होते.

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिवाळा असल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर फळविक्रेत्यांची मोफत कोरोना चाचणी करण्यात आली.

त्यामध्ये 150 फळविक्रेते, मसाले विक्रेते सहभागी झाले होते. त्यापैकी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शिबिरामुळे कोरोनाचे निदान होवून त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.