Pimpri News : शिवछत्रपती पुरस्कार विजेते एव्हरेस्टवीर राजेश पटाडे यांनी 63 व्या वर्षी लिंगाणा केला सर

एमपीसी न्यूज – ट्रेकर्सच्या दृष्टीकोनातून चढाईस अत्यंत कठीण मानला जाणारा, गिरीदुर्ग प्रकारातील लिंगाणा हा किल्ला 63 वर्षीय राजेश पटाडे यांनी सर केला आहे. राजेश पटाडे यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले असून 1983 मध्ये त्यांनी लिंगाणावर प्रथम चढाई केली होती.

पटाडे यांनी 2001 मध्ये टाटा मोटर्स कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ गिर्यारोहण या क्रीडाप्रकारात करीअर करायचे ठरवले. उत्तर कशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग या संस्थेतून त्यांनी ट्रेकिंगचे प्रशिक्षण घेतले. पटाडे यांनी गिर्यारोहणाच्या अनेक मोहिमा यशस्वी केल्या आहेत. तसेच, यापूर्वी देखील अनेकवेळा त्यांनी लिंगाणा सर केला आहे.

लोकांमध्ये ट्रेकिंगची आवड निर्माण व्हावी तसेच, चांगले ट्रेकर्स तयार व्हावेत यासाठी पटाडे यांनी मावळातील डहुली या गावात डोंगराच्या पायथ्याला गिर्यारोहणाचे थडे देण्यासाठी शिवराय इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग अ‍ॅन्ड कामेत अ‍ॅडव्हेंचर ही संस्था सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर हजारो लोकांना प्रशिक्षण दिले आहे. पटाडे यांनी अमेरिका, स्पेन, जर्मनी, स्वीडन देशातील परदेशी नागरिकांना देखील त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

राजेश पटाडे सध्या श्रीधरनगर, चिंचवड या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वयाच्या 63 व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह दांडगा आहे. लोकांमध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. ट्रेकिंग कसे करावे, त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि घ्यावयाची काळजी याबाबत ते मार्गदर्शन करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.