Pimpri news: विसापूर गडाच्या पायरी मार्गाजवळ आढळलेली शिवकालिन तोफ शिवप्रेमींकडून गडावर स्थलांतरित

एमपीसी न्यूज : विसापूर गडाच्या पाटण पायरीमार्गाजवळ मालेवाडीच्या आनंता गोरे या स्थानिक तरुणाला मातीत अर्धवट गाडलेली शिवकालिन तोफ काही महिन्यांपूर्वी आढळून आली होती. शनिवार, 5 नोव्हेंबर रोजी पुरातत्त्व विभागाच्या गजानन मांडवरेकर या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

सदर तोफ रविवार 6 नोव्हेंबर रोजी शासनाच्या अधिकारी यांचे तोंडी परवानगीने व गडपाल सतिष ढगे यांचे उपस्थितीत मावळ, कुलाबा, संभाजीनगर येथील शिवप्रेमी यांनी यशस्वीरित्या गडावर स्थलांतरित करण्यात केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेल्या मावळ तालुक्यांतील गडकिल्ले (Gadkille in Maval Taluka) हे मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. असाच भक्कम तटबंदी असलेला संबळगड अर्थात विसापूर किल्ला. किल्याच्या मध्यभागी असलेल्या मालेवाडी गावातील आनंता गोरे याला काही महिन्यापूर्वी शिवकालिन तोफ आढळून आली होती. ती माहिती त्याने विशाल भाऊसाहेब हुलावळे, शिवप्रसाद सुतार, भीमा शिंगाडे, प्रकाश गोरे यांना कळवली. त्यानंतर याबद्दलची माहिती पुरातत्व विभाग, स्थानिक आमदार, खासदार, तहसीलदार, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांना याबाबत कळविण्यात आली.

पुण्यात पाच मोबाईल शॉपीमध्ये घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बिहार मधून अटक

त्यानुसार पुरातत्व खात्याचे अधिकारी गजानन मंडवरेकर यांनी शनिवारी 5 नोव्हेंबर रोजी या तोफेची पाहणी केली. त्यानुसार शिवप्रेमी व शिवभक्तांनी रविवारी ही तोफ गडावर स्थलांतरित करण्याची मोहिम आखली. त्यानुसार रविवारी शिवप्रेमी व शिवभक्त एकत्र येत तोफेची पूजा करून 10 वाजता ही तोफ गडावर नेण्याची मोहिम सुरू झाली. सुमारे चार तासांनंतर ही तोफ गडावर यशस्वीरित्या स्थलांतरित झाली.

ह्या मोहिमेसाठी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मरगळे, शिवप्रसाद सुतार, महेश गायकवाड, विशाल भाऊसाहेब हुलावळे, सतिष साठे, प्रकाश गोरे, बाळू गोरे, सतिष ढगे, बाबुराव तिकोणे, आनंता गोरे, विराज साठे,प्रतिक माने, मयुर पाटील, अक्षय पाटील, निखिल तांडेल, हर्षल नर, ऋषिकेश रघुवीर, जयेश मांढरे, रवि सिंग, रोहित तांडेल, वंदेश भोईर, प्रितेश पवार इत्यादी शिवप्रेमी व शिवभक्त उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.